अंकिता खाणे (Ankita Khane)
उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरल्यास कडक सूर्यप्रकाशामुळे होणारे टॅनिंग टाळता येते आणि त्वचेची चमकही कायम राहते. याच कारणामुळे या ऋतूत महिला सनस्क्रीन वापरतात.
हा अलिकडेच आलेला क्रिमचा प्रकार अल्पावधीतच महिलांच्या पसंतीस उतरला आहे.
कुठेही बाहेर जायचे असेल तर सन्सस्क्रीम लावूनच महिला घराबाहेर पडतात. पण, सतत त्वचेवर सनस्क्रीनचा लेप देणं त्वचेसाठी धोक्याचं ठरू शकतं.
यामुळे चेहऱ्याची, हाता-पायांची त्वचेला लालसरपणा, खाज येणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळेच आज सनस्क्रीनच्या अतिवापरामुळे त्वचेचे काय नुकसान होऊ शकते याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
सनस्क्रीनच्या जास्त वापरामुळे त्वचेला खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येऊ शकते. सनस्क्रीन अनेक केमिकल्सच्या मदतीने बनवलेली असते.
या सर्व केमिकल्समुळे टॅनिंगची समस्या टाळता येते. मात्र, तुम्ही जास्त सनस्क्रीन वापरल्यास, या रसायनांमुळे त्वचेला खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज येऊ शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात सनस्क्रीन वापरा.
सनस्क्रीनच्या अतिवापरामुळे खाज, लालसरपणा, सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात, तर चेहऱ्यावर लावताना चुकून सनस्क्रीन डोळ्यांत गेल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते.
चेहऱ्यावर सनस्क्रीन लावताना ते डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
सनस्क्रीनचा जास्त वापर केल्यास मुरुमांची समस्याही उद्भवू शकते. जास्त सनस्क्रीन लावल्याने फक्त चेहऱ्यावरील ऑईल पेशी सक्रिय होतात.
त्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते. काही वेळा त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीन न घेतल्याने मुरुमांची समस्या देखील उद्भवू शकते.
सनस्क्रीम माहिती असलेल्या कंपनीचीच निवडा. कारण, किंमत कमी आहे, मैत्रिणी वापरतात म्हणून तुम्ही सनस्क्रीन निवडू नका.
यामुळे चेहरा आणि त्वचेला इन्फेक्शन पसरू शकते. त्यामुळे खात्रीशीर सनस्क्रीनच वापरा. तसेच, ती वापरण्याआधी हातावर पॅच टेस्ट करा.
आंघोळ केल्यानंतर आणि संध्याकाळी चेहरा, हात आणि पाय धुतल्यानंतर सनस्क्रीन वापरा. शरीरावरील जो भाग थेट सुर्यप्रकाशात येतो त्यालाच क्रीम लावा. चेहरा, हात, पाय तसेच कान आणि मानेला सनस्क्रीन लावा.
सनस्क्रीन दिसेनाशी होईपर्यंत चेहऱ्यावर चोळत राहा. चेहरा स्वच्छ धुवून मगच क्रीम लावा. हलक्या क्वालिटीची क्रीम निवडू नका