Saisimran Ghashi
वजन वाढून पोट सुटणे ही हल्ली एक सामान्य समस्या बनली आहे.
अशात यामागची नेमकी कारणे काय शोधून त्यावर उपाय करणे महत्त्वाचे असते.
जास्त प्रमाणात साखरयुक्त किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यास वजन झपाट्याने वाढते.
शरीराला हालचाल कमी मिळाल्यास पोटाजवळील चरबी साठते.
मानसिक ताणामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्यामुळे पोटाची चरबी वाढते.
महिलांमध्ये पाळीचक्रातील असंतुलन किंवा थायरॉईडमुळे पोट सुटण्याची शक्यता असते.
रात्री उशिरा किंवा अनियमित खाण्यामुळे चरबी साठते.
पोषणमूल्य कमी असलेल्या जंक फूडमुळे चरबी वाढते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.