Anuradha Vipat
अभिनेत्री मृणाल ठाकूर इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय आहे.
मृणाल बऱ्याचदा तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना मराठीत उत्तरे देते.
मृणालने इन्स्टाग्रामवर नुकतेच ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतले होते.
त्यात तिच्या एका चाहत्याने तिला “मराठीतील तीन सर्वांत छान शब्द कोणते? हा प्रश्न विचारला होता
यावर मृणाल ठाकूर म्हणाली की, मला ‘अभिनेत्री’ हा मराठीतील छान शब्द वाटतो. मला हा शब्द फार आवडतो.
पुढे मृणाल ठाकूर म्हणाली की, त्यानंतर ‘कलाकार’ हा शब्द मला खूप आवडतो.
पुढे मृणाल ठाकूर म्हणाली की, तिसरा शब्द ‘जेवण’, ‘कोशिंबीर’ आणि ‘वातावरण’ हे शब्दही मला खूप आवडतात. मला वाटतं ‘वातावरण’ हा सगळ्यांचा आवडता शब्द आहे.