पुजा बोनकिले
अनेकांना कोंड्यांचा त्रास होतो.
पण हा त्रास कशामुळे होतो हे जाणून घेऊया.
कोंडा हा निरुपद्रवी आजार आहे.
कोंड्यामुळे त्वचेला खाज सुटू लागते.
त्वचेवर नेहमीच वास्तव्य करणाऱ्या एका बुरशीसदृश जिवाणूची वाढ होऊ लागते.
आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती खालावली, की ही बुरशी वाढू लागते व त्वचेच्या वरच्या थरातील पेशींचे पुंजके मृत होतात. ते बाहेर टाकले जातात, त्याला कोंडा म्हणतात.
कोणत्याही दीर्घ काळ चालणाऱ्या आजारात एड्ससारख्या विकारात हा आजार अधिक होतो.
आपल्या मेंदूतील मज्जापेशींच्या कार्याचा देखील या प्रतिकारशक्तीशी संबंध असतो.
पार्किन्सन्स डिसीज या आजाराने ग्रस्त रुग्णांत जर मेंदूला रक्तपुरवठा कमी पडला तर कोंडा होऊ लागतो.
त्यावरून मज्जासंस्थेचा व कोंडा होण्याचा काही तरी संबंध असावा, असे तज्ज्ञांना वाटते.
पिटिरोस्पोरम् ओव्हॅली हा बुरशीचा प्रकार मानवी त्वचेवर आणि केसांच्या मुळांमध्ये असतो. आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्याने तो त्वचेच्या पेशींना इजा करू लागतो.
अतिथंड किंवा फार उष्ण हवेतदेखील त्वचेच्या वरच्या थराच्या खपल्या निघतात व कोंडा होतो. केस गळण्याचे कोंडा होणे हे एक प्रमुख कारण असू शकते.