दिल्लीतील लाल किल्ला सुरूवातील कोणत्या रंगात होता? नंतर तो का, कधी आणि कुणी रंगवला?

Mansi Khambe

लाल किल्ला

दिल्लीतील लाल किल्ला हा केवळ भारताचा अभिमानच नाही तर इतिहास आणि संस्कृतीचे मौल्यवान प्रतीक देखील आहे.

Red Fort | ESakal

लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. दिल्लीतील लाल किल्ल्यावर आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा अभिमानाने फडकतो.

Red Fort | ESakal

पूर्वी लाल रंगाचा नव्हता

पण तुम्हाला माहिती आहे का की ज्याला आपण 'लाल किल्ला' म्हणतो तो पूर्वी लाल रंगाचा नव्हता. आपण त्याच्या रंगामुळे लाल किल्ला म्हणतो तो पूर्वी कोणता रंगाचा होता आणि तो कधी आणि कोणी रंगवला?

Red Fort | ESakal

किला-ए-मुबारक

लाल किल्ल्याचे जुने नाव 'किला-ए-मुबारक' होते. १७ व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने तो बांधला होता. बांधण्यासाठी एक दशक लागले.

Red Fort | ESakal

मुघल स्थापत्यकला

हा किल्ला सम्राटाच्या शक्ती आणि भव्यतेचे प्रतीक म्हणून बांधण्यात आला होता. हा किल्ला मुघल स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. ज्यामध्ये पर्शियन, तिमुरी आणि हिंदू शैलींचे मिश्रण दिसून येते.

Red Fort | ESakal

शाहजहान

हा किल्ला मूळतः पांढऱ्या रंगाचा होता. कारण जेव्हा शाहजहानने तो बांधला तेव्हा किल्ल्याच्या भिंती आणि अनेक भाग पांढरा चुना आणि संगमरवरी रंगाने बनलेले होते. ज्यामुळे त्याला एक चमकदार पांढरा लूक मिळाला.

Red Fort | ESakal

ब्रिटीश

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर जेव्हा ब्रिटीशांनी किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा त्यांनी त्याची देखभाल करण्यास सुरुवात केली. कालांतराने पांढऱ्या चुनखडीच्या भिंती खराब होऊ लागल्या.

Red Fort | ESakal

भिंती लाल रंगवल्या

त्यानंतर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला किल्ल्याच्या दुरुस्तीदरम्यान ब्रिटीशांनी त्याच्या भिंती लाल रंगवल्या.

Red Fort | ESakal

लाल वाळूचा दगड

हा निर्णय केवळ संवर्धनासाठीच नाही तर लाल वाळूच्या दगडाच्या ताकदीमुळे आणि त्या वेळी प्रचलित असलेल्या साहित्याच्या वापरामुळे घेण्यात आला. तेव्हापासून हा किल्ला 'लाल किल्ला' म्हणून प्रसिद्ध झाला.

Red Fort | ESakal

श्रावण पौर्णिमेलाच रक्षाबंधन सण का साजरा केला जातो?

Raksha bandhan | Sakal
येथे क्लिक करा