Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण मातोश्री जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली झाले.
इ.स. १६३० ते १६३६ या काळात बालशिवाजी आणि जिजाबाई सतत किल्ल्यांवरून फिरत होते.
निजामाची राजधानी दौलताबाद मोगलांच्या ताब्यात १७ जून १६३३ रोजी गेली.
त्यानंतर शहाजीराजांनी भीमगड येथे निजामशहाची गादी उभारली आणि स्वतः वजीर झाले.
त्या वेळी जिजाबाई आणि बालशिवाजी जुन्नर येथे वास्तव्यास होते.
मोगल सरदारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवरायांना शिवापुरीला पाठवले गेले.
नंतर जिजाबाई मोगलांच्या तावडीत सापडून नाशिक येथे कैदेत होत्या.
त्यांच्या चुलत्याच्या मध्यस्थीने त्यांची सुटका झाली आणि त्या प्रेमगिरीस गेल्या.
काही दिवसांत विजापूरकरांनी प्रेमगिरी किल्ला वेढा घातला.
शहाजीराजांनी मग निजामशहासह माहुली किल्ल्यावर आश्रय घेतला.
माहुलीवरही वेढा पडल्याने शेवटी त्यांनी किल्ला खाली केला.
शिवाजी महाराज आणि जिजाबाई नंतर पुण्यास राहायला आले.
बालपणापासूनच शिवरायांना राजकारण, संकटं आणि संघर्ष यांचा अनुभव आला.