Anuradha Vipat
अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाचा बहुप्रतिक्षीत ‘पुष्पा 2’ चित्रपट गुरुवारी (५ डिसेंबर रोजी) प्रदर्शित झाला.
दोन दिवसांत या चित्रपटाने ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
आता बिग बॉस मराठी’ फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने ‘पुष्पा 2’ बद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
अंकिताने कलाकारांचा अभिनय चांगला असल्याचं म्हटलं आहे.
मात्र चित्रपटाची कथा चांगली नसल्याचं अंकिता म्हणाली आहे .
अंकिताने लोकांना ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी पैसे वाया न घालवण्याचा सल्ला दिला आहे.
आता अंकिताने इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे.