Anuradha Vipat
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
आता अशा या लोकप्रिय अरुंधतीने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
आता अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकताच इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.
यावेळी मधुराणीने ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी देखील भाष्य केलं.
इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये मधुराणी प्रभुलकरला विचारलं की, ‘आई कुठे काय करते’च्या दुसऱ्या पर्वाचा प्लॅन करा.
यावर मधुराणी म्हणाली, “‘स्टार प्रवाह’चं अकाउंट आहे. त्यांना हे नक्की पाठवा. त्यांनी जर ठरवलं तर आम्हा सगळ्यांना पुन्हा दुसरं पर्व करायला आवडेल.
मधुराणी सोशल मिडीयावर सक्रिय असते