Anuradha Vipat
‘मी टू’ मोहिमेअंतर्गत तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे आणि साक्षीदार नसल्याने वर्षभरात हा खटला मिटला.
या घटनेनंतर नानांनी एका मुलाखतीत तनुश्रीच्या आरोपांवर मौन सोडलं होतं.
“माझ्याविरोधात आरोप खोटे आहेत हे मला माहित होतं आणि म्हणूनच मी त्या गोष्टीवर चिडलो किंवा रागावलो नाही”, असं नाना पाटेकर या मुलाखतीत म्हणाले होते.
सोशल मीडियामुळे लोकांचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलतो याविषयीही नाना पाटेकर व्यक्त झाले होते
नाना पाटेकर सोशल मिडीयावर सक्रिय असतात
नाना पाटेकर सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात