सुनिता विल्यम्सने अंतराळात काय खाल्लं?

सूरज यादव

जून महिन्यात ८ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या पण ८ महिन्यांपेक्षा जास्त काळ अडकलेल्या सुनिता विल्यम्स अन् बुच विल्मोर हे पृथ्वीवर परत येत आहेत.

What Did Sunita Williams Eat in Space | Esakal

भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे साडेतीन वाजता सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर उतरतील. समुद्रात त्यांचे पॅराशूटच्या सहाय्याने लँडिंग होईल.

What Did Sunita Williams Eat in Space | Esakal

बुच विल्मोर यांचं वय ६१ वर्षे आहे तर सुनिता विल्यम्स या ५९ वर्षांच्या आहेत. गेल्या २८६ दिवसांपासून दोघे अंतराळात आहेत.

What Did Sunita Williams Eat in Space | Esakal

अंतराळात ८ दिवसांसाठी गेले असताना इतके महिने अडकल्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्याची आणि इतर व्यवस्था काय होती असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत.

What Did Sunita Williams Eat in Space | Esakal

अंतराळवीरांच्या रोजच्या आहारात व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही पदार्थ होते. पावडर, दूध, धान्य, पिझ्झा, रोस्ट चिकन, टूना फिश यांचा समावेश त्यांच्या जेवणात होता.

What Did Sunita Williams Eat in Space | Esakal

अंतराळात खाल्ले जाणारे मांसाहारी पदार्थ पृथ्वीवरच शिजवलेले असतात. अंतराळात फक्त ते गरम करण्यात येते.

What Did Sunita Williams Eat in Space | Esakal

अंतराळ स्थानकातील अंतराळवीराला दररोज १.७२ किलो अन्न पुरवण्यात येतं. यातलं अन्न फ्रीज, ड्राय आणि पॅक केलेलं असतं.

What Did Sunita Williams Eat in Space | Esakal

फूड वॉर्मरने अन्न गरम केलं जातं. मिशनच्या आपत्कालीन परिस्थिती अन्न साठवण्याची सुविधाही उपलब्ध असते.

What Did Sunita Williams Eat in Space | Esakal

कल्पना चावलाचा मृत्यू कसा झाला? लँडिंगच्या १६ मिनिटं आधी घडली होती दुर्घटना

Kalpana Chawala | Esakal
इथं क्लिक करा