चार्जरवरील 20W, 33W आणि 67W चा अर्थ काय आहे?

Mansi Khambe

चार्जर

जेव्हा तुम्ही नवीन मोबाईल फोन विकत घेता, तेव्हा तुम्हाला त्यासोबत येणाऱ्या चार्जरवर 20W, 33W, 45W, किंवा 67W असे आकडे नक्कीच दिसतील. पण कधी प्रश्न पडला आहे का की, या आकड्यांचा अर्थ काय?

Charger wattage

|

ESakal

चार्जर वॅटेज

67W चा चार्जर 20W च्या चार्जरपेक्षा फोन तीनपट वेगाने चार्ज करतो का? जास्त वॅटेजचा चार्जर विकत घेतल्याने तुमचा फोन अधिक वेगाने चार्ज होईल का? हे आकडे चार्जर किती पॉवर देऊ शकतो याच्याशी थेट संबंधित आहेत. चला हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

Charger wattage

|

ESakal

20W, 33W, 67Wचा अर्थ

चार्जरवरील W हे चिन्ह वॅट (Watt) दर्शवते. हे विद्युत शक्ती मोजण्याचे एक एकक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, वॅट हे चार्जर किती पॉवर देऊ शकतो हे दर्शवते.

Charger wattage

|

ESakal

जास्त पॉवर

20०W चार्जर २० वॅटपर्यंत पॉवर देऊ शकतो. ३३W चार्जर २०W चार्जरपेक्षा जास्त पॉवर देऊ शकतो. तर ६७W चार्जर अधिक पॉवर देण्यास सक्षम असतो.

Charger wattage

|

ESakal

चार्ज पातळी

जर तुमचा फोन 67W चार्जिंगला सपोर्ट करत असेल तर तो अधिक वेगाने चार्ज होऊ शकतो. बॅटरीची चार्ज पातळी आणि तिचे गरम होणे याचाही चार्जिंगच्या वेगावर परिणाम होतो.

Charger wattage

|

ESakal

वेगाने चार्ज

फोन किती वेगाने चार्ज होतो हे अनेक घटकांवर अवलंबून असते. सर्वप्रथम, फोनची चार्जिंग क्षमता महत्त्वाची असते. शिवाय, काही कंपन्यांच्या फोनमध्ये विशेष फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान असते, त्यामुळे योग्य चार्जर वापरणे आवश्यक आहे.

Charger wattage

|

ESakal

नवीन चार्जर

नवीन चार्जर खरेदी करण्यापूर्वी, तुमचा फोन किती चार्जिंग वॅटेजला सपोर्ट करतो हे तपासा आणि त्यानुसार खरेदी करा. केवळ वॅटेज रेटिंगच्या आधारावर महागडा चार्जर खरेदी करण्यात काही अर्थ नाही.

Charger wattage

|

ESakal

वाय-फाय राउटरवर विविध रंगाचे लाइट्स का असतात? प्रत्येक दिव्याचा अर्थ काय?

Wi-Fi routers lights

|

ESakal

येथे क्लिक करा