मांस, दूध, अंडी सगळंच बंद! मग Vegan लोक खातात तरी काय?

Anushka Tapshalkar

Vegan म्हणजे काय?

Vegan म्हणजे फक्त आहार नव्हे, तर प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर टाळण्याची जीवनशैली. यात मांस, मासे, दूध, अंडी आणि मध यांचा समावेश होत नाही.

Vegan

|

sakal

कोणते पदार्थ टाळले जातात?

मांस, चिकन, पोर्क, बीफ, लॅम्ब यांसोबतच मासे, खेकडे आणि इतर सीफूड Vegan आहारात टाळले जाते.

What Vegans Avoid

|

sakal

दूध आणि अंडीही नाही!

दूध, चीज, बटर, दही आणि अंडी यांचा वापर Vegan जीवनशैलीत केला जात नाही. मध, जिलेटिन आणि काही प्राणिजन्य खाद्य रंगही टाळले जातात.

Not Even Milk and Eggs

|

sakal

Vegan लोक काय खातात?

फळे, भाज्या, तांदूळ, ओट्स, गहू, बीन्स, डाळी, कडधान्ये, नट्स आणि बिया हे Vegan आहारातील प्रमुख पदार्थ आहेत

What Do Vegans Eat?

|

sakal

Plant-Based Milk पर्याय

Vegan आहारात गाई-म्हशीच्या दुधाऐवजी सोया मिल्क, बदाम मिल्क आणि ओट मिल्क यांसारखे वनस्पतीजन्य पर्याय वापरले जातात.

Plant Based Milk

|

sakal

Vegan होण्यामागे आरोग्यही एक कारण

काही लोक हृदयाच्या आरोग्यासाठी आणि आहारातील फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी Vegan आहार निवडतात. मात्र संतुलित आणि पोषणमूल्यपूर्ण आहार घेणे महत्त्वाचे आहे.

Reason Behind Turning a Vegan

|

sakal

प्राण्यांसोबत पर्यावरणाचीही काळजी

प्राण्यांवरील अत्याचार कमी करणे आणि पशुपालनामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम व कार्बन उत्सर्जन कमी करणे, हीदेखील Vegan जीवनशैली स्वीकारण्यामागची प्रमुख कारणे आहेत.

Environment Harm Awareness

|

sakal

Chanakya Niti: दिवसा झोपल्याने काय होतं? आचार्य चाणक्यांचा सल्ला एकदा वाचाच

Acharya Chanakya | sakal
आणखी वाचा