रामायण-महाभारत ग्रंथावरही कॉपीराइट लागतो का? काय आहे कायदा? जाणून घ्या...

Mansi Khambe

रणबीर कपूरचा रामायण चित्रपट

पुढील वर्षी दिवाळीत रणबीर कपूरचा रामायण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार असून निर्मात्यांनी चित्रपटाची पहिली झलक दाखवली आहे.

Copyright Law on movie | ESakal

अनेक चित्रपट प्रदर्शित

आतापर्यंत रामायणावर अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपट आधीच बनवले गेले आहेत. यापूर्वी प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपटही रामायणाच्या थीमवर प्रदर्शित झाला होता.

Copyright Law | ESakal

धार्मिक विषयांवरील चित्रपट

तसेच गेल्या काही वर्षांत धार्मिक विषयांवर चित्रपट बनवण्याचा पूर आला आहे. आदिपुरुष, ओह माय गॉड २, कल्की, ब्रह्मास्त्र हे काही चित्रपट धार्मिक विषयांवर बनले आहेत.

Copyright Law | ESakal

कॉपीराइट

आता असा प्रश्न पडतो की, रामायण किंवा महाभारतासारख्या ग्रंथांवर बनवलेल्या चित्रपटांनाही कॉपीराइट आहे का? यासंदर्भात देशात काय कायदा आहे? याबाबत जाणून घ्या

Copyright Law | ESakal

कायदा काय म्हणतो?

कॉपीराइट नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी देशात कॉपीराइट कायदा १९५७ लागू आहे. हा कायदा कला, साहित्य, संगीत, चित्रपट यासारख्या मूळ कलाकृतींच्या निर्मात्यांच्या हक्कांचे रक्षण करतो.

Copyright Law | ESakal

निर्मात्याची परवानगी

या कायद्यानुसार कोणत्याही कामातील मजकूर त्याच्या मूळ निर्मात्याच्या परवानगीशिवाय वापरता येत नाही.

Copyright Law | ESakal

दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

तथापि, दिल्ली उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये एक निकालात भगवद्गीता, महाभारत किंवा रामायण यांसारख्या धार्मिक ग्रंथांवर कॉपीराइटचा दावा करता येणार नाही, असे म्हटले होते.

Delhi high court | ESakal

संरक्षणाचा अधिकार

चित्रपटाचे कोणतेही अर्थ लावणे, रूपांतर किंवा नाट्यमय काम कॉपीराइटच्या अधीन असेल आणि मूळ निर्मात्याला कॉपीराइट संरक्षणाचा अधिकार असेल.

Copyright Law | ESakal

योग्य काळजी

म्हणजेच धार्मिक ग्रंथांवर चित्रपट बनवता येतात, परंतु चित्रपटात पूर्वी केलेले कोणतेही रूपांतर किंवा बदल वापरले जाऊ नयेत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

Copyright Law | ESakal

पोलिसांप्रमाणे लष्करी जवानांनाही गोळ्यांचा हिशेब द्यावा लागतो का? जाणून घ्या...

Indian Army | esakal
येथे क्लिक करा