‘Mayday’ म्हणजे नेमकं काय? विमानाला धोका निर्माण झाल्यावर पायलट हा शब्द का उच्चारतो?

Anushka Tapshalkar

उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान लँड करताना झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झालं.

What Does Mayday Mean

|

sakal

मेडे कॉल

धोक्याची चाहूल लागताच पायलटने ‘मेडे कॉल’ का दिला नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण हा कॉल नेमका काय असतो आणि तो देणं का महत्त्वाचं असतं, ते जाणून घेऊया.

What Does Mayday Mean

|

sakal

'Mayday' म्हणजे काय?

‘Mayday’ हा एक आपत्कालीन कोड वर्ड आहे. विमान संकटात असताना पायलट रेडिओवर तीन वेळा “Mayday Mayday Mayday” असा कॉल करतो.

What Does Mayday Mean

|

sakal

'Mayday' शब्दाचा उपयोग कधी करतात?

हा शब्द केवळ गंभीर संकटात, जसे की इंजिन फेल होणे, आग लागणे किंवा क्रॅश लँडिंगची गरज भासल्यास वापरला जातो.

What Does Mayday Mean

|

sakal

प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी कोड वर्ड

पायलट ‘आपत्कालीन स्थिती’ अशी थेट घोषणा करत नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती व गोंधळ पसरण्याचा धोका टळतो.

What Does Mayday Mean

|

sakal

क्रू मेंबर्सना सावध करण्यासाठी

“Mayday” ऐकताच विमानातील क्रू त्वरित सावध होतात आणि आपत्कालीन प्रक्रिया सुरू करतात.

What Does Mayday Mean

|

sakal

तीनदा का म्हणतात 'Mayday'?

रेडिओवर हस्तक्षेप, आवाज किंवा गोंगाट यामुळे संदेश स्पष्ट पोहोचावा म्हणून ‘Mayday’ तीन वेळा उच्चारला जातो.

What Does Mayday Mean

|

sakal

शब्दाची सुरुवात कशी झाली?

1920 मध्ये लंडनच्या क्रॉडॉन एअरपोर्टवरील रेडिओ ऑफिसर फ्रेडरिक मॉकफोर्ड यांनी ‘m’aider’ या फ्रेंच शब्दावरून ‘Mayday’ तयार केला.

What Does Mayday Mean

|

sakal

फ्रेंच भाषेतील अर्थ

‘M’aider’ चा अर्थ होतो “माझी मदत करा”. हाच शब्द इंग्रजीत 'Mayday' म्हणून वापरला जातो.

What Does Mayday Mean

|

sakal

विमान अन् हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले देशातील राजकीय नेते

what is the airplane black box ajit pawar plane crash death

|

esakal

आणखी वाचा