पुजा बोनकिले
दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो.
हा दिवस सर्व मातांना समर्पित असतो.
यंदा ११ मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे.
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे आईच्या निस्वार्थ सेवेबद्दल आणि प्रेमाबद्दल तिचा आदर करणे हा आहे.
हा दिवस खास बनवण्यासाठी प्रत्येकजण विविध पद्धतीने साजरा करतात.
पण तुम्हाला आई या शब्दाचा अर्थ माहिती आहे का?
आ म्हणजे 'आत्मा' आणि ई म्हणजे 'ईश्वर' या दोघांचा संगम म्हणजे आई.