Anushka Tapshalkar
निरोगी जीभ साधारण फिकट ते मध्यम गुलाबी असते. तिच्यावर छोटे पॅपिली दिसतात. सकाळी उठल्यावर हलका पांढरट थर असणे सामान्य असू शकते.
Tongue Color Health Signs
sakal
जिभेवर पांढरा थर अपुरी स्वच्छता, कोरडेपणा, धूम्रपान किंवा ओरल थ्रशमुळे दिसू शकतो. पांढरा चट्टा निघत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Tongue Color Health Signs
sakal
जीभ किंवा तोंडाची त्वचा फिकट दिसणे हे अॅनिमिया किंवा लोहाच्या कमतरतेचे संकेत असू शकते. मात्र, निदानासाठी रक्ततपासणी आवश्यक आहे.
Tongue Color Health Signs
sakal
जीभ लाल, चमकदार किंवा गुळगुळीत दिसणे हे लोह, फोलेट किंवा व्हिटॅमिन B12 कमतरतेचे संकेत असू शकते. काही संसर्गांमध्ये ‘स्ट्रॉबेरी टंग’ही दिसते.
Tongue Color Health Signs
sakal
पिवळसर जीभ जिवाणूंचा थर, अपुरी तोंडाची स्वच्छता किंवा कोरडेपणामुळे दिसू शकते. धूम्रपान, काही पदार्थ, औषधे किंवा सप्लिमेंट्समुळेही रंग बदलू शकतो. पिवळी जीभ म्हणजे पोटाचा आजारच, असे नाही.
Tongue Color Health Signs
sakal
जीभ किंवा ओठ निळसर-जांभळे पडणे रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्याचे संकेत असू शकते. श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत दुखत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Tongue Color Health Signs
sakal
काळी, तपकिरी किंवा केसाळ जीभ दिसली तरी ती नेहमी गंभीर नसते. Black Hairy Tongueमध्ये पॅपिली लांब होऊन त्यावर जिवाणू व अन्नकण साचतात. अस्वच्छता, धूम्रपान, कोरडेपणा आणि काही अँटीबायोटिक्स यामुळे धोका वाढू शकतो.
Tongue Color Health Signs
sakal
Does lemon coffee help with weight loss
sakal