Anushka Tapshalkar
मधुमेह हा शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढणारा दीर्घकालीन आजार आहे.
त्यामुळे मधुमेही रुग्णांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी कायम आपल्या रक्तामधील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवावे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व तपासण्या व औषधे यांमध्ये नियमितपणा ठेवावा.
मधुमेहामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो, म्हणून नियमित तपासणी करा.
पायांना जखमा होणार नाहीत याची काळजी घ्या, कारण मधुमेहामुळे जखमा लवकर भरत नाहीत.
दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करावा.
योग, ध्यान आणि छंद जोपासून मन शांत ठेवा. ताणतणावाचे नियोजन करा.
सात्त्विक व नियोजनबद्ध आहार आपल्या अंगवळणी बाळगा.
मधुमेहाच्या बाबतीत Calorie Management करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
नियमित आरोग्य तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवा.