पावसाळ्यात कोणती फळं खावीत अन् कोणती टाळावीत?

Anushka Tapshalkar

व्हिटॅमिन C आणि फायबरयुक्त फळं

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनाच्या तक्रारी टाळण्यासाठी व्हिटॅमिन C व फायबरने समृद्ध फळांचा आहारात समावेश करा.

Citrus and Fibrous Fruits 

|

eSakal

जांभूळ पावसाळ्यातलं सुपरफूड

जांभूळ पचनसंस्था निरोगी ठेवण्यास, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि जीवाणूजन्य संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

Jamun

|

Sakal

नाशपाती, डाळिंब आणि पपई

नाशपाती अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, डाळिंब रोगप्रतिकारशक्ती वाढवते, तर पपईतील 'पपेन' एन्झाइम पचन सुधारण्यास मदत करते.

Pair, Pomegranate & Papaya

|

sakal

लिची, आलूबुखारा आणि चेरी

ही फळे व्हिटॅमिन C, A, K आणि फायबरचा चांगला स्रोत असून सूज कमी करण्यास व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Lichi, Alubukhara & Cherry

|

sakal

कापलेल्या फळांची खरेदी नको

पावसाळ्यात कापलेल्या फळांवर जीवाणू वेगाने वाढू शकतात. त्यामुळे फळे घरीच ताजी कापून खाणे अधिक सुरक्षित आहे.

Cut Fruits

|

sakal

नीट धुवूनच खा

फळे स्वच्छ पाण्याने धुवा. शक्य असल्यास पाणी आणि थोडा बेकिंग सोडा किंवा व्हिनेगरच्या मिश्रणात धुऊन पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा.

Wash Fruits Neatly

|

sakal

टरबूज आणि खरबूज खाणं टाळा

अधिक पाण्याचे प्रमाण असलेली फळे दमट हवामानात लवकर खराब होऊ शकतात आणि दूषित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात त्यांचे सेवन मर्यादित ठेवणे योग्य ठरते.

Avoid Watermelon & Muskmelon

|

sakal

महिनाभर रोज भिजवलेल्या भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

What Happens If You Eat Soaked Pumpkin Seeds Every Day for a Month

| Sakal
आणखी वाचा