Saisimran Ghashi
मुघल साम्राज्याचा कार्यकाल १५२६ ते १८५७ पर्यंत मानला जातो आणि या काळात मुघल सम्राटांच्या पत्नींची स्थिती शाही परंपरांशी निगडित होती.
मुघल सम्राट अनेक वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या स्त्रियांशी विवाह करत, त्यामध्ये मुघल, राजपूत, तुर्की आणि पारसी घराण्यांतील राजकन्यांचा समावेश असे.
सम्राटाच्या मृत्यूनंतर त्यांच्या राण्यांच्या आयुष्याबाबत इतिहासात फारशा स्पष्ट नोंदी नाहीत, मात्र काही संदर्भातून त्यांचे जीवन कसे असेल याचा अंदाज लावता येतो.
सम्राट गेल्यानंतर राण्यांना कडक पर्दा पद्धतीचे पालन करावे लागे आणि त्यांची वावरण्याची जागा मर्यादित होत असे.
राण्यांचे वास्तव्य आग्रा, दिल्ली व लाहोरमधील झनानाखाना या स्त्रियांसाठीच्या स्वतंत्र विभागांमध्ये असायचे.
मुघल राण्या आपले बहुतेक वेळ धार्मिक पूजाअर्चा, कुराण पठण, दानधर्म, तसेच संगीत, काव्य आणि हस्तकलेसारख्या कलांमध्ये व्यतीत करत.
जोधाबाई, ज्यांना मरियम-उज्ज-जमानी म्हणूनही ओळखले जाते, अकबरच्या मृत्यूनंतर त्यांनी उर्वरित जीवन महालात राहून धार्मिकतेत घालवले, असे म्हटले जाते
मुमताज महलचा मृत्यू शाहजहानच्या कारकिर्दीतच झाला आणि तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ ताजमहाल उभारण्यात आला.
काही मुघल राण्यांनी आपल्या मुलांच्या अधिकारांसाठी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला, त्यात नुरजहानचा विशेष उल्लेख करता येतो, जिला जहांगीरच्या मृत्यूनंतर काही काळ सत्तेवर प्रभाव होता.