पुजा बोनकिले
आजारी पडल्यावर लगेच औषधे घेतो.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का , की औषध पोटात गेल्यावर काय होतं
डॉ. तन्मयी रानडे यांनी औषध पोटात गेल्यावर काय होतं हे सांगितले आहे.
आपण औषधाची गोळी गिळतो किंवा पातळ औषध घेतो तेव्हा इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच पोटात जाते.
पोटात गेल्यावर त्या गोळीचे तुकडे होतात आणि त्यातली औषधी पोटात हळूहळू विरघळायला लागतात.
गोळीमधले औषधी घटक एकदा पोटात विरघळल्यानंतर त्याचा शरीरात प्रवास सुरू होतो.
हे घटक हळूहळू रक्तात शोषले जातात.
तसेच रक्तात उतरले की त्याचा आपल्या शरीरावर परिणाम दिसू लागतो.