बाईकचं पेट्रोल संपल्यावर ढकलत नेता किंवा बाजूला लावता, विमानाचं इंधन संपलं तर काय?

सकाळ डिजिटल टीम

इंधन

बाइक किंवा कारचं पेट्रोल संपलं तर ढकलत नेलं जातं. नाहीतर पेट्रोल आणून भरल्यानंतर पुन्हा प्रवास सुरू होतो. पण विमानाचं इंधन संपलं तर काय? असा विचार केलायत का?

Plane Fuel

|

Esakal

विमान उड्डाण

हवाई प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो. विमानाच्या उड्डाणाआधीच त्यात आवश्यक तेवढं इंधन असेल याची कटाक्षाने काळजी घेतली जाते.

Plane Fuel

|

Esakal

आपत्कालीन स्थिती

आपत्कालीन स्थिती कधी निर्माण होईल हे सांगता येत नाही त्यामुळे इंधन संपले तर काय करायचं याचंही प्रशिक्षण पायलटना दिलं जातं.

Plane Fuel

|

Esakal

पर्याय

इंधन संपलं तर विमानाचे इंजिन बंद होते पण ठराविक अंतर उड्डाण करू शकते. याला ग्लायडिंग असं म्हणतात. प्रत्येक विमानाचं ग्लायडिंगचं प्रमाण ठरलेलं असतं.

Plane Fuel

|

Esakal

ग्लाइडिंग गुणोत्तर

एखाद्या विमानाचं ग्लायडिंग गुणोत्तर १५:१ असं असेल तर त्याचा अर्थ ३५ हजार फूट उंचीवर विमान असेल तर ते १५० किमीपर्यंत अंतर जाऊ शकते.

Plane Fuel

|

Esakal

ग्लायडिंग

ग्लायडिंगच्या अंतरात पायलट इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतात आणि जवळच्या विमानतळावर विमान उतरवतात.

Plane Fuel

|

Esakal

RAT

इंधन संपल्याच्या परिस्थितीत विमानात एक य़ंत्रणा असते. रॅम एअर टर्बाइनवर बेसिक सिस्टिम चालवली जाते. यासाठी वाऱ्याच्या ताकदीचा वापर केला जातो.

Plane Fuel

|

Esakal

प्रशिक्षण

विमानाच्या उड्डाणाआधीच इंधनाचा साठा आणि पर्यायी विमानतळांचा प्लॅन तयार असतो. आपत्कालीन परिस्थितीत काय करावं याचं प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं.

Plane Fuel

|

Esakal

घटना

इंधन संपण्याच्या घटना दुर्मिळ असून १९८३ मध्ये आणि २००१ मध्ये घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही.

Plane Fuel

|

Esakal

औरंगजेब किती वर्षे जगला? त्याच्या मृत्यूवेळी पणतू होता २५ वर्षांचा

Aurangzeb

|

Esakal

इथं क्लिक करा