सूरज यादव
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. राष्ट्रगीत सुरू असताना त्यांनी हातवारे केल्याचं दिसून येतंय.
एका कार्यक्रमात राष्ट्रगीतासाठी उभा राहिल्यानंतर नीतीश कुमार त्यांच्या प्रमुख सचिवांशी बोलताना दिसतात.
एखाद्याने राष्ट्रगीताचा अपमान केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. कायद्यानुसार हा गुन्हा आहे.
नॅशनल ऑनर अॅक्ट, १९७१ अंतर्गत असं केल्यास ३ वर्षांची शिक्षा किंवा दंड केला जाऊ शकतो. किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
भारतीय संविधानाच्या कलम ५१ए नुसार देशाच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रगीताचा आदर करणं अनिवार्य आहे.
राष्ट्रगीतावेळी कोणत्याही पद्धतीने याचा अपमान करणं हे चुकीचं असल्याचं कायद्यात म्हटलं आहे.
राष्ट्रगीताच्या आचारसंहितेबाबत म्हटलं आहे की, राष्ट्रगीत गायलं जात असेल किंवा आवाज ऐकू आला तर ऐकणाऱ्यांनी आदर म्हणून उभा राहिलं पाहिजे.