E85 गाडीमध्ये 100 टक्के पेट्रोल टाकल्यास काय होईल?

संतोष कानडे

E85 इंधन

भारतात E85 इंधन लाँच झालं आहे. यामध्ये ८५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल आणि उर्वरित पेट्रोल असणार आहे.

सपोर्ट

या इंधनासाठी सपोर्ट करणारी वाहनं बाजारात येत आहेत. मारुती सुझूकीने वॅग्नॉर गाडी आणली आहे.

पेट्रोल

अशी वाहने E20, E85 आणि शुद्ध पेट्रोल यांसारख्या विविध इंधन मिश्रणांवर चालण्यासाठीच तयार केलेली असतात.

शंभर टक्के पेट्रोल

या वाहनांमध्ये शंभर टक्के पेट्रोल टाकलं तरी काहीही बिघडणार नाही. ही वाहनं आरामात पूर्ण पेट्रोलवर चालतील.

इंधन

वाहनातील विशेष सेन्सर्स इंधनातील इथेनॉलचे प्रमाण ओळखतात. त्यानुसार इंजिनचे संगणक इंधन पुरवठा आणि ज्वलन प्रक्रिया आपोआप समायोजित करतात.

शुद्ध पेट्रोल

काही वेळा शुद्ध पेट्रोलवर वाहनाला E85 पेक्षा अधिक मायलेज मिळू शकते. मात्र इथेनॉलचे प्रमाण कमी झाल्याने E85 वापरल्यास मिळणारे काही पर्यावरणीय फायदे कमी होतात.

फ्लेक्स-फ्युएल

फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देशच विविध प्रकारच्या इंधनांमध्ये लवचिकता देणे हा आहे.

धोका नाही

म्हणून E85-सुसंगत गाडीमध्ये 100 टक्के पेट्रोल टाकल्यास वाहन सुरळीत चालते आणि सामान्यतः कोणताही धोका निर्माण होत नाही.

मुघल बादशहा झोपण्यापूर्वी कोणते विधी करायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>