सलग 1 महिना जवासाच्या बिया खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Anushka Tapshalkar

जवस

जवस (Flaxseeds) हे फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि महत्त्वाच्या पोषक तत्त्वांनी समृद्ध सुपरफूड मानले जाते.

Flax Seeds

|

sakal

पचनक्रिया सुधारते

जवसमधील भरपूर फायबर आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवते, बद्धकोष्ठता कमी करते आणि पोट फुगण्याचा त्रासही कमी करण्यास मदत करते.

Improves Digestion

|

sakal

हृदयाचे आरोग्य मजबूत

नियमित जवस सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच LDL (वाईट) कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.

Heart Health

| sakal

डायबिटीज नियंत्रण

दररोज 10-20 ग्रॅम जवस पावडर घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते.

Diabetes Control

|

sakal

हार्मोन संतुलन

जवसमधील लिग्नॅन्स हे वनस्पतीजन्य इस्ट्रोजेनसारखे कार्य करतात. त्यामुळे महिलांमध्ये रजोनिवृत्तीची लक्षणे जसे हॉट फ्लॅशेस आणि मूड स्विंग्स कमी होण्यास मदत होऊ शकते.

Hormones

| sakal

त्वचा आणि केसांना फायदा

ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स त्वचेला नैसर्गिक ओलावा देतात, सूज कमी करतात आणि केसांना अधिक मजबूत व चमकदार बनवतात.

Hair and Skin

|

sakal

महिनाभर सेवन केल्यास

नियमित जवस खाल्ल्याने पचन, हृदयाचे आरोग्य, रक्तातील साखर, हार्मोनल संतुलन तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यात सुधारणा जाणवू शकते

sakal

1 महिना चहा बंद केल्याने शरीरात काय बदल होतात?

sakal

आणखी वाचा