Anushka Tapshalkar
उकडलेल्या हरभऱ्यामध्ये भरपूर वनस्पतीजन्य प्रोटीन असते. त्यामुळे स्नायू मजबूत राहण्यास आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते.
High Protein
sakal
हरभऱ्यातील फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारते, पचन सुरळीत ठेवते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.
Boost Digestion
sakal
फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
Weight Management
sakal
उकडलेल्या हरभऱ्यातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही याचा फायदा होऊ शकतो.
Blood Sugar Control
sakal
हरभऱ्यामध्ये लोह (Iron) आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. हे हिमोग्लोबिन वाढविण्यास आणि थकवा कमी करण्यास उपयुक्त ठरते.
Improves Blood
sakal
मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो.
Heart Health
sakal
उकडलेले हरभरे साधे खाऊ शकता किंवा त्यावर मीठ, लिंबू आणि भाज्या घालून हेल्दी सॅलड तयार करू शकता. हा पोटभर आणि पौष्टिक नाश्ता ठरतो.
ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणताही आजार किंवा विशेष आहार असल्यास आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.