सलग ३० दिवस चहा-बिस्किट खाल्लं तर शरीरात कोणते बदल होतात?

Anushka Tapshalkar

रक्तातील साखर

बिस्किटांमधील मैदा आणि साखरेमुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. गोड चहा घेतल्यास हा परिणाम आणखी वाढतो आणि इन्सुलिनची पातळीही वाढते.

Diabetes

|

Sakal

थकवा

चहा-बिस्किटांमध्ये प्रथिने आणि फायबर कमी असल्याने ऊर्जा फार काळ टिकत नाही. त्यामुळे लवकर भूक लागून थकवा आणि चिडचिड जाणवू शकते.

Fatigue

|

sakal

प्रथिने

चहा-बिस्किटांमधून पुरेशी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे स्नायूंच्या दुरुस्तीवर परिणाम होऊ शकतो आणि वारंवार भूक लागू शकते.

Protein

|

sakal

पचन

बिस्किटांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रोज हाच नाश्ता केल्यास आहारातून पुरेसे फायबर मिळत नाही. परिणामी बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात.

Digestion

| Sakal

लोह

चहामधील टॅनिन्समुळे शरीरातील लोहाचे शोषण कमी होऊ शकते. त्यामुळे लोहाची कमतरता असणाऱ्यांनी जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळावे.

Iron

|

sakal

वजनवाढ

बिस्किटांमधील अतिरिक्त साखर आणि फॅट्समुळे कॅलरीज वाढतात. त्यामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो.

Weight gain

|

sakal

पौष्टिक पर्याय

चहा पिण्याची सवय सोडू नका; मात्र बिस्किटांऐवजी भिजवलेले बदाम, भाजलेले मखाणे, उकडलेले अंडे, बेसनाचा चिला किंवा पेरू-केळ्यासारख्या फळांचा नाश्त्यात समावेश करा.

Balanced Diet | sakal

लक्षात ठेवा

रोज चहा-बिस्किटे खाल्ल्याने मधुमेह होतोच असे नाही. मात्र पौष्टिक नाश्त्याऐवजी हाच पर्याय निवडल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक कमी पडू शकतात.

Tea and Biscuits

|

sakal

हिवाळ्यातील ७ फळं ठरतील आरोग्यासाठी फायदेशीर! डायबेटीस, कोलेस्ट्रॉल ते ग्लोइंग स्किनसाठी काय खावं?

Winter Fruits

|

sakal

आणखी वाचा