Puja Bonkile
अतिगोड पदार्थामुळे रक्तातील ग्लुकोज अचानक वाढतो. ज्यामुळे थकवा, चिडचिड आणि धाप लागणं यासारखी लक्षणं दिसू शकतात.
तुम्ही जर अतिसाखर खात असाल तर लठ्ठपणा वाढू शकतो.
नेहमी साखर खाल्ल्यास शरीर इन्सुलिनच्या प्रभावाला प्रतिसाद देणं बंद करते. ज्यामुळे टाईप 2 डायबेटीसचा धोका वाढतो.
अतिसाखर खाल्ल्यामुळे त्वचा कोरडी किंवा पिंपल्स त्रास होऊ शकतो.
साखरेचा अतिरेक आतड्यांतील बॅक्टेरियाचा समतोल बिघडवतो. ज्यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि अपचन होते.
अति प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे मूड स्विंग्स, चिडचिड, तणाव आणि मेंदूतील कार्यक्षमता कमी होते.
सतत अति प्रमाणात साखर खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
साखरेमधील फ्रुक्टोज थेट यकृतावर परिणाम करतात. तसेच जास्त प्रमाणात घेतल्यास फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
यामुळे अतिगोड पदार्थांचे सेवन प्रमाणात करावे.