Anushka Tapshalkar
सकाळी अलार्म वाजल्यानंतर पुन्हा ५-१० मिनिटं झोपण्यासाठी स्नूझ बटन दाबता? पण ही सवय तुम्हाला फ्रेश करण्याऐवजी अधिक आळशी बनवू शकते.
स्नूझ बटन दाबून पुन्हा डोळे मिटल्यावर मेंदू झोपेच्या प्रक्रियेत पुन्हा सहभागी होतो. त्यामुळे झोप आणि जागेपणाच्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय येऊ शकतो.
Brain in Sleep Mode
sakal
पुन्हा झोपल्यानंतर काही मिनिटांतच अलार्म वाजल्याने अचानक जाग येते. अशावेळी डोकं जड वाटणे, आळस येणे आणि एकाग्रता कमी होणे याला 'स्लीप इनर्शिया' म्हणतात.
Sleep Inertia
sakal
वारंवार स्नूझ केल्याने झोपेची गुणवत्ता बिघडू शकते. सकाळी उठल्यानंतर सुस्ती, थकवा आणि कामात लक्ष न लागणे अशा समस्या जाणवू शकतात.
Fatigue
sakal
अपुर्या किंवा वारंवार खंडित झालेल्या झोपेमुळे मेंदूला पूर्ण विश्रांती मिळत नाही. त्यामुळे सकाळी निर्णयक्षमता आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
Effect on Brain's Functioning
sakal
दहा अलार्म लावण्यापेक्षा झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. पुरेशी झोप घेऊन पहिल्याच अलार्मवर उठण्याचा प्रयत्न करा.
Consistency in Alarms
Sakal
उठल्यानंतर खिडकीचे पडदे उघडा आणि सकाळच्या नैसर्गिक प्रकाशात काही वेळ घालवा. यामुळे शरीराचे जैविक घड्याळ (Body Clock) नियमित राहण्यास आणि जागृत होण्यास मदत होते.
Morning Sunlight
sakal
Ayurvedic Skincare Tips for Winter
sakal