लिंबू उभा चिरल्यास काय होते? विज्ञान आणि लोकसमज काय सांगतात, जाणून घ्या!

सकाळ डिजिटल टीम

लिंबू

तुम्ही अनेकदा एकले असेल की लिंबू उभा चिरु नये असे म्हंंटले जाते. या का मागचे नेमके कारण काय आहे जाणून घ्या.

Lemon Cutting

|

sakal 

विज्ञानाचा दृष्टिकोन

विज्ञानानुसार, लिंबाच्या आत उभ्या धाग्यांसारख्या रसाच्या पिशव्या (Juice Vesicles) असतात. लिंबू उभा चिरल्यास या पिशव्या पूर्णपणे कापल्या जात नाहीत, त्यामुळे आडव्या कापलेल्या लिंबाच्या तुलनेत उभा चिरलेल्या लिंबातून रस कमी निघतो.

Lemon Cutting

|

sakal

पेशींची रचना

लिंबाची अंतर्गत रचना ही पाकळ्यांच्या स्वरूपात केंद्रापासून परिघाकडे असते. आडवा छेद घेतल्यास या सर्व पाकळ्या उघडल्या जातात आणि रस काढणे सोपे होते, जे उभ्या छेदात शक्य होत नाही.

Lemon Cutting

|

sakal 

स्वयंपाकघरातील वापर

पाश्चात्य देशांमध्ये किंवा हॉटेलमध्ये गार्निशिंगसाठी (सजावटीसाठी) लिंबू उभा चिरला जातो, कारण त्याच्या उभ्या फोडी दिसायला अधिक आकर्षक दिसतात.

Lemon Cutting

|

sakal 

लोकसमज

भारतीय लोकसमजुतीनुसार, नजर काढण्यासाठी किंवा 'उतारा' करण्यासाठी लिंबू उभा चिरला जातो. उभा चिरलेला लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, अशी काहींची धारणा आहे.

Lemon Cutting

|

sakal 

धार्मिक विधी

काही विशिष्ट धार्मिक विधी किंवा तंत्रशास्त्रात "शत्रू विनाशाचे" प्रतीक म्हणून लिंबू उभा कापला जातो, तर सात्विक पूजेमध्ये लिंबू सहसा आडवा कापला जातो असे म्हणतात.

Lemon Cutting

|

sakal 

लिंबू 'बळी'

प्राचीन काळी प्राण्यांच्या बळीऐवजी प्रतिकात्मक स्वरूपात लिंबू कापण्याची प्रथा सुरू झाली. अनेकदा नवीन वास्तू किंवा वाहनाच्या पूजेवेळी लिंबू उभा चिरून त्याला कुंकू लावले जाते.

Lemon Cutting

|

sakal 

अंधश्रद्धा आणि भीती

उभा लिंबू कापल्यास काहीतरी अघटित घडते, हा केवळ एक गैरसमज आहे. आधुनिक काळात या गोष्टींना कोणताही आधार उरलेला नाही.

Lemon Cutting

|

sakal 

तज्ज्ञांचा सल्ला

जर तुम्हाला लिंबाचा जास्तीत जास्त रस हवा असेल, तर लिंबू कापण्यापूर्वी तो हाताने जमिनीवर थोडा दाबून गोल फिरवावा (Roll) आणि त्यानंतर तो आडवाच कापावा.

Lemon Cutting

|

sakal 

हिवाळ्यात बदाम सगळ्यांसाठी फायदेशीर नसतात! 'या' लोकांनी खाणे टाळावे

Who Should Avoid Eating Almonds in Winter

|

sakal

येथे क्लिक करा