दोन विमानं आकाशात समोरासमोर आले तर काय होतं?

संतोष कानडे

दोन विमानं

आकाशात दोन विमानं एकाच मार्गावर समोरासमोर येऊ नयेत, यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा सतत लक्ष ठेवते.

हवाई मार्ग

प्रत्येक विमानाला उड्डाणासाठी ठरावीक हवाई मार्ग आणि उंची दिलेली असते.

वैमानिक

दोन विमानं जवळ येण्याची शक्यता निर्माण झाल्यास वैमानिकांना तातडीने सूचना दिल्या जातात.

एअर ट्रॅफिक कंट्रोल

एअर ट्रॅफिक कंट्रोल एका विमानाला उंची वाढवण्यास किंवा कमी करण्यास सांगू शकते.

मार्ग

गरज पडल्यास विमानाचा मार्ग बदलण्याचे निर्देशही दिले जातात.

टक्कर

आधुनिक विमानांमध्ये TCAS नावाची टक्कर टाळणारी यंत्रणा असते.

सतर्क

ही यंत्रणा जवळ येणाऱ्या दुसऱ्या विमानाचा शोध घेऊन वैमानिकाला सतर्क करते.

आदेश

टक्कर होण्याचा धोका असल्यास TCAS एका विमानाला वर जाण्याचा, तर दुसऱ्याला खाली जाण्याचा आदेश देऊ शकते.

सूचना

वैमानिकांनी या सूचनांचे तातडीने पालन केल्यास संभाव्य टक्कर टाळता येते.

नियंत्रण

त्यामुळे दोन विमानं समोरासमोर आली तरी योग्य नियंत्रण, तंत्रज्ञान आणि वैमानिकांच्या निर्णयामुळे सुरक्षित अंतर राखणे शक्य होते.

झोपेतून उठल्यावर लहान मुलं का रडतात?

<strong>येथे क्लिक करा</strong>