Pranali Kodre
कोरफड औषधी आहे, हे अनेकांना माहिती आहे. चेहरा आणि केसांना कोरफड लावल्याने अनेकांना फायदाही होतो.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर (Aloe Vera Gel) चेहऱ्याला लावण्याचेही अनेक फायदे होऊ शकतात.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
कोरफडीमध्ये ९९ टक्के पाणी असल्याने रात्रभर चेहऱ्याला पुरेसे हायड्रेशन मिळते आणि त्वचा मऊ राहू शकते.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
कोरफडीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी--इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग आणि सूज कमी होण्यासही मदत होते.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
नियमित रात्री कोरफड लावल्याने त्वचेचा निस्तेजपणा जाऊन चेहरा चमकदार दिसण्यासही मदत होते.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
कोरफडीमध्ये असेलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी व ई त्वचेचे फ्री-रेडिकल्सपासून संरक्षण करतात आणि चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होण्यास मदत होते.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
कोरफडीमुळे उन्हाने किंवा ऍलर्जीने होणारी त्वचेची जळजळ किंवा टॅनिंग कमी होण्यासही मदत होते.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
चेहरा स्वच्छ धुवून वाळल्यानंतर कोरफडीचा गर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून मसाज करता येतो. हा गर रात्रभर ठेवून सकाळी धुवू शकता.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
कोरफडीचा गर वापरताना त्याचील पिवळा रस (ऍलोइन) निघून जाऊ द्या, कारण त्यामुळे खाज किंवा ऍलर्जी होऊ शकते.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
तसेच कोरफड सर्वांना सूट होईलच असं नाही. काहींना कोरफडीचा गर लावल्याने खाज, लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे आधी पॅच टेस्ट करा किंवा तज्ञांना विचारून निर्णय घ्या.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Aloe Vera Night Skin Benefits
Sakal
Why Aloe Vera Leaves Turn Yellow?
Sakal