सकाळ डिजिटल टीम
दुधाची चहा खूप आवडीने पिली जाते. पण हे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाहीये.
चहा पिण्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो
जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन झोप चांगली लागण्यात व्यत्यय आणते, ज्यामुळे निद्रानाशाच्या समस्या उद्भवू शकतात.
चहा पिण्यामुळे शरीरातील रासायनिक असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढल्यानंतर मुरुमे आणि पुरळ होण्याची शक्यता आहे.
चहामध्ये कॅफिन आणि थियोफिलाइन असल्यामुळे जास्त चहाचे सेवन केल्याने पोटफुगी आणि डिहायड्रेशनचा होऊ शकते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या देखील उद्भवू शकते.
चहामध्ये कॅल्शियमयुक्त दूध मिसळल्याने ते आम्लयुक्त बनते, ज्यामुळे पचनाशी संबंधित विविध समस्या उद्भवू शकतात.
जास्त चहा पिल्याने रक्तदाब वाढण्याचे आणि हृदयाशी संबंधित समस्या होण्याची शक्यता असते.
चहामध्ये कॅफिन असल्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्यास मन विचलित होणे, चिंता वाटणे आणि ताण वाढू शकतो.
जर कोणतीही समस्या उद्भवली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.