Shubham Banubakode
ट्रेनमध्ये लाल चेन ओढल्यावर ब्रेक यंत्रणेतील हवेचा दाब कमी होऊ शकतो. त्यामुळे ब्रेक लागतात आणि ट्रेनचा वेग कमी होऊ लागतो.
Indian Railways
esakal
प्रवाशाने चेन ओढल्यावर ब्रेकच्या दाबात बदल होतो. इंजिनमधील उपकरणांच्या मदतीने ड्रायव्हरला हा बदल समजू शकतो.
Indian Railways
esakal
चेन ओढताच ट्रेन जागच्या जागी थांबत नाही. ट्रेनचा वेग, वजन आणि ब्रेकची स्थिती यानुसार तिला थांबण्यासाठी काही अंतर पार करावं लागतं.
Indian Railways
esakal
ट्रेन थांबल्यानंतर रेल्वे कर्मचारी ती का थांबली, याची चौकशी करतात. गरज असल्यास संबंधित डब्यात जाऊन प्रवाशाला मदत करतात.
Indian Railways
esakal
पारंपरिक एअर-ब्रेक असलेल्या ट्रेनमध्ये चेन ओढल्याने ब्रेक पाइपमधील हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे जोडलेल्या डब्यांमध्ये ब्रेक लागू शकतात.
Indian Railways
esakal
फक्त आपल्या सोयीसाठी चेन ओढल्यास ट्रेनला उशीर होऊ शकतो. रेल्वे कायद्यानुसार योग्य कारण नसताना चेन ओढल्यास दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो.
Indian Railways
esakal
प्रत्येक ट्रेनमध्ये चेन ओढल्यावर एकसारखा अलार्म किंवा दिवा सुरू होतोच असं नाही. ड्रायव्हरला ब्रेकच्या दाबातील बदलावरून परिस्थिती समजू शकते.
Indian Railways
esakal
प्रवासात एखाद्याची तब्येत अचानक बिघडली किंवा गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर मदत मिळवण्यासाठी चेनची व्यवस्था केलेली असते.
Indian Railways
esakal
कन्फर्म तिकीट असूनही ट्रेनमध्ये सीट मिळाली नाही? रेल्वेकडून मिळू शकते नुकसानभरपाई
Confirmed Train Ticket but No Seat
esakal