सकाळ डिजिटल टीम
'रुद्राक्ष' हा भगवान शिवाशी संबंधित असून त्यांच्या अश्रूंपासून तयार होतो, अशी पौराणिक कथा आहे. अनेक लोक धार्मिक कारणांसाठी रुद्राक्ष धारण करतात, परंतु त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
गळ्यात रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक आणि शारीरिक शांती मिळते. याशिवाय, हे भगवान शंकराच्या आशीर्वादाचे प्रतीक देखील मानले जाते.
रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक रुद्राक्ष वेगवेगळे फायदे देतो, जसे 5 मुखी रुद्राक्ष शांतीसाठी आणि 7 मुखी रुद्राक्ष संपत्तीसाठी धारण केले जातात.
काम करताना तुमचे लक्ष विचलित होत असल्यास, रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे काम करताना लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.
रुद्राक्ष जपमाळ धारण वाईट नजरांपासून बचाव होतो
गळ्यात रुद्राक्ष धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरांपासून आपला बचाव होतो.केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय, तुम्ही तंदुरुस्त राहता
गळ्यात रुद्राक्ष धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरांपासून आपला बचाव होतो.
रुद्राक्ष धारण केल्याने मायग्रेन, थकवा आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या कमी होतात. त्यामुळे धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त लोकांना ते घालायलाही आवडते.
गळ्यात रुद्राक्ष धारण केल्याने माणूस अध्यात्माकडे जातो. शिवाय, यामुळे देवाप्रती भक्ती आणि श्रद्धा वाढते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.