पुजा बोनकिले
फायबरमुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते.
तसेच रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत करू शकते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते पचनक्रिया सुरळित ठेवायची असेल तर आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.
शरीरात फायबरची कमतरता झाल्यास कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या समस्या वाढू शकतात.
फायबरमुळे तृप्ती मिळते. त्याच्या कमतरतेमुळे भूक वाढून वजन वाढू शकते.
फायबर रक्तातील साखर आणि LDL कोलेस्टेरॉल नियंत्रित करते. कमी फायबरमुळे हे वाढू शकतात.
फायबर प्री-बायोटिक म्हणून काम करते. त्याच्या कमतरतेमुळे आतड्यांतील चांगले जीवाणू कमी होऊ शकतात.