Shubham Banubakode
घराच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या मुंग्या निसर्गासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जगातील सर्व मुंग्या एक दिवस गायब झाल्या तर मोठे बदल घडू शकतात.
Ants Disappear From Earth
esakal
मुंग्या जमिनीत बिळं आणि बोगदे तयार करतात. त्यामुळे मातीमध्ये हवा खेळती राहते आणि पाणी झाडांच्या मुळांपर्यंत सहज पोहोचतं.
Ants Disappear From Earth
esakal
मेलेले कीटक, अन्नाचे कण आणि झाडांची पानं साफ करण्यात मुंग्यांची मदत होते. त्या नसल्यास जैविक कचरा साचण्याचं प्रमाण वाढेल.
Ants Disappear From Earth
esakal
मुंग्या वाळवी, अळ्या आणि पिकांना नुकसान करणाऱ्या कीटकांना खातात. त्या गायब झाल्यास अशा कीटकांची संख्या वाढून शेतीसमोर संकट उभं राहू शकतं.
Ants Disappear From Earth
esakal
पक्षी, सरडे, बेडूक आणि काही साप मुंग्यांवर अन्नासाठी अवलंबून असतात. मुंग्या गायब झाल्यास या जीवांना पर्यायी अन्न शोधावं लागेल.
Ants Disappear From Earth
esakal
मुंग्या नसल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या प्राण्यांच्या खाण्यापिण्यावर परिणाम होईल. त्यामुळे जंगलातील अन्नसाखळीचं नैसर्गिक संतुलनही बिघडू शकतं.
Ants Disappear From Earth
esakal
काही मुंग्या झाडांच्या बिया एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जातात. त्यामुळे नवीन रोपं उगवण्यास मदत होते. ही प्रक्रियाही थांबेल.
Ants Disappear From Earth
esakal
मुंग्या आकाराने छोट्या असल्या तरी निसर्गातील त्यांचं काम मोठं आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे पर्यावरणातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया विस्कळीत होऊ शकतात.
Ants Disappear From Earth
esakal
virgin
esakal