Puja Bonkile
तुम्ही शस्त्रसंधी आणि शस्त्रसंधी उल्लंघन हा शब्द ऐकला असेल किंवा वाचला असेल.
पण शस्त्रसंधी कशी होते आणि शस्त्रसंधीच उल्लघन कसं होत हे जाणून घेऊया.
शस्त्रसंधी म्हणजे दोन किंवा अधिक राष्ट्रांमधील युद्ध किंवा सशस्त्र संघर्ष थांबवण्यासाठी केलेला एक तात्पुरता किंवा कायमचा शांतता करार असतो.
शस्त्रसंधीचं उल्लंघन म्हणजे या कराराचे पालन न करणे, जसे की गोळीबार करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचा भंग करणे.
शस्त्रसंधी करारात शस्त्रे वापरण्याची परवानगी नसते, त्यामुळे शस्त्रे वापरल्यास शस्त्रसंधीचे उल्लंघन होते.
भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली होती पण पाकिस्तानने जम्मु-काश्मिरमध्ये ड्रोन आणि तोफगोळ्यांचे हल्ले केले आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.