सूरज यादव
इराणविरोधातील युद्धात अमेरिकेचे लष्कर ५०० पाउंड, १ हजार पाउंड आणि दोन हजार पाउंड वजनाचे 'ग्रॅव्हिटी बाँब' या लष्करी संघर्षात वापरणार आहेत..
Gravity Bomb
Esakal
गेल्या काही दिवसांत टॉमहॉक क्रूझ मिसाइल आणि लुकास ड्रोन हे इराणच्या हवाई क्षेत्रावर अमेरिका-इस्राईल वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वापरले जात होते.
Gravity Bomb
Esakal
'ग्रॅव्हिटी बॉम्ब 'ला पूर्वी 'फ्री-फॉल बॉम्ब' म्हटले जात असे. इंजिन नसलेले शस्त्र म्हणून त्याची ओळख आहे. क्रूझ मिसाइलप्रमाणे (उदा. टॉमहॉक) त्यात अंतर्गत इंजिन नसते.
Gravity Bomb
Esakal
विमानातून सोडल्यानंतर त्याचा मार्ग पूर्णपणे गुरुत्वाकर्षण, हवेचा प्रतिकार आणि विमानाची उंची व वेग यावर अवलंबून असतो. नाव ऐकून ते जुन्या शस्त्रांसारखे वाटले तरी प्रत्यक्षात हे आधुनिक अमेरिकी वायुदलाचे मुख्य शस्त्र मानले जाते.
Gravity Bomb
Esakal
सन २००० नंतर इराक, अफगाणिस्तान आणि सीरियामध्ये ग्रॅव्हिटी बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे; तसेच इस्राईलने गाझा आणि लेबनॉनमध्येही त्यांचा वापर केला आहे.
Gravity Bomb
Esakal
अमेरिकेने पारंपरिक 'फ्री फॉल बॉम्ब 'ना 'जेडीएएम' किट जोडून अत्यंत अचूक शस्त्र बनवले आहे. या किटमध्ये जीपीएस प्रणाली आणि दिशा बदलू शकणारे सेन्सर असल्याने अचूक मारा शक्य.
Gravity Bomb
Esakal
मिसाइलचा वापर करणे खर्चिक असले तरी त्यामध्ये पायलट सुरक्षित राहतो. मात्र, दुसरीकडे ग्रॅव्हिटी बॉम्ब तुलनेने कमी खर्चिक असून त्याने मोठा हल्ला शक्य आहे.
Gravity Bomb
Esakal
लक्ष्याच्या जवळ जाऊनच ग्रॅव्हिटी बॉम्ब टाकावा लागतो. एखाद्या सैन्याला पूर्ण हवाई वर्चस्व मिळाल्यानंतरच या बॉम्बचा वापर शक्य आहे.
Gravity Bomb
Esakal
संरक्षणमंत्री हेगसेथ यांनी उल्लेख केलेले बॉम्ब पूर्णपणे पारंपरिक शस्त्र आहेत. यामध्ये शेकडो पाउंड सामान्य रासायनिक स्फोटके असतात. 'जेडीएएम' किटसह एका बॉम्बची किंमत साधारण २५ ते ३० हजार डॉलर असते.
Gravity Bomb
Esakal
LPG production
ESakal