सकाळ डिजिटल टीम
व्हॅलेंटाइन वीक 14 फेब्रुवारीला संपतो, पण त्यानंतर 15 फेब्रुवारीपासून सुरू होतो "एंटी-व्हॅलेंटाइन वीक". या आठवड्याचा उद्देश प्रेम आणि ब्रेकअपच्या वेदनांपासून मुक्त होण्याचा असतो.
व्हॅलेंटाइन वीकच्या प्रेमाच्या वातावरणानंतर, एंटी-व्हॅलेंटाइन वीक साजरा होतो. सिंगल्स आणि ब्रेकअप केलेल्या लोकांसाठी हा एक वेगळा अनुभव असतो.
या आठवड्यात 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान 7 दिवस साजरे केले जातात, जे प्रेमाच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी आणि स्वतंत्रपणे आनंद अनुभवण्यासाठी असतात.
स्लॅप डे, म्हणजेच आपल्या सर्व वेदनांवर त्वरित प्रतिक्रिया देण्याचा दिवस. या दिवशी दिलेल्या दुःखावर थोडा हसण्याचा प्रयत्न केला जातो.
किक डे म्हणजेच स्वतःला आणि इतरांना त्याच त्या वेदनांपासून बाहेर काढून काहीतरी नवं करण्याचा दिवस.
परफ्यूम डे हा दिवस, स्वतःच्या ओळखीला आणि व्यक्तिमत्वाला महत्त्व देण्याचा दिवस असतो.
फ्लर्ट डे म्हणजेच इतरांसोबत संवाद साधण्याचा आणि हलक्या फुलक्या क्षणांचा आनंद घेण्याचा दिवस.
कन्फेशन डेवर आपली भावना आणि विचार दुसऱ्याशी मोकळेपणाने शेअर करणे.
मिसिंग डे म्हणजे त्या व्यक्तीला किंवा घटनेसाठी उदास होण्याचा दिवस. एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची किंवा कनेक्शनची गमावलेली किमत जाणीव करण्याचा दिवस.
ब्रेकअप डे हा दिवस आपल्याला असलेल्या वेदना, शोक आणि दुःखातून बाहेर पडण्याचा आहे. प्रेमाच्या ओझ्यापासून मुक्त होण्याचा दिवस.
व्हॅलेंटाइन वीकसारखा एंटी-व्हॅलेंटाइन वीक साजरा करणे हा आता तरुणाईमध्ये ट्रेंड बनला आहे.