Saisimran Ghashi
हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक असलेलं गरूड पुराण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हे पुराण भगवान विष्णू यांच्या भक्तांना दिलेल्या ज्ञानावर आधारित आहे.
गरूड पुराणामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचा प्रवास, स्वर्ग आणि नरक यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे.
गरूड पुराणानुसार, पृथ्वीवर केलेली पापं व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला काय शिक्षा मिळेल हे ठरवतात. यासाठी यमराज आणि चित्रगुप्त यांची महत्वाची भूमिका असते.
गरूड पुराणात दिलेल्या वर्णनानुसार, व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला स्वर्गात पाठवायचं की नरकात हे ठरवतात. कर्माच्या आधारावर जीवनाचा पुढचा मार्ग ठरतो.
गरूड पुराणात असं सांगितलं आहे की, भ्रूण हत्या करणं हे सर्वात मोठं महापाप आहे. अशा व्यक्तीला रोध नामक नरकात पाठवून कठोर शिक्षा दिली जाते.
भ्रूण हत्या करणाऱ्यांच्या पुढच्या जन्मामध्ये त्यांना नपुंसक बनवण्यात येतं. हा एक गंभीर परिणाम असतो, असं गरूड पुराण सांगतं.
गरूड पुराणानुसार, जो व्यक्ती गुरुची निंदा किंवा अपमान करतो किंवा चोरी करतो, त्याला मृत्यूनंतर शबल नरकात पाठवलं जातं. तेथे कठोर शिक्षा दिली जाते.
गरूड पुराणात 36 नरकांचं सविस्तर वर्णन आहे, ज्यामध्ये व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा दिली जाते.
या सर्व पापांच्या शिक्षा व्यक्तीला त्याच्या चुकीच्या कर्मांचा भास देण्यासाठी आणि त्यांना सुधारण्याची प्रेरणा देण्यासाठी असतात, असं गरूड पुराणात सांगितलं आहे.