कोळंबीच्या पाठीवरची काळी रेष कसली असते? ती न काढता कोळंबी खाऊ शकतो का?

Payal Naik

कोळंबी फ्राय

मासे खाणाऱ्यांच्या यादीत कोळंबी नाही असं क्वचितच होतं. कोळंबी कोळीवाडा, कोळंबी फ्राय, कोळंबी भात असे अनेक पदार्थ कोळंबीपासून बनू शकतात.

prowns

|

esakal

काळी रेष

अनेकजण कोळंबी मार्केटमधून आणल्यावर साफ करतात आणि शिजवून खातात. मात्र तिच्या पाठीवरची काळी रेष काढत नाहीत.

prowns

|

esakal

परिणाम

ही काळी रेष कसली असते याबद्दलही त्यांना ठाऊक नसतं. ती न काढता खाल्ली तर आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो हे देखील अनेकांना ठाऊक नसतं.

prowns.jpg

|

esakal

पचननालिका

कोळंबीच्या पाठीवरचा काळा धागा हा तिची नस नसून तिची पचननालिका असते. त्यात कोळंबीने खाल्लेले अन्न, वाळू, सूक्ष्म कण आणि इतर अपशिष्ट पदार्थ साचलेले असू शकतात. त्यामुळे ती काळी दिसते.

prowns

|

esakal

सल्ला

त्यामुळे ही काळी रेष काढायचा सल्ला दिला जातो. मोठ्या झिंगा किंवा कोळंबीच्या बाबतीत ही रेष काढणं सोपं आहे. मात्र छोट्या कोळंबीमध्ये ही रेष काढणं अवघड जातं.

prowns

|

esakal

किटाणू

जर ही रेष काढली नाही तर काय? कोळंबी शिजवून खाल्ल्यानंतर त्यातले अनेक किटाणू आधीच नष्ट झालेले असतात. त्यामुळे कोळंबीची रेष काढली नाही तर फारसा काही फरक पडत नाही.

prowns

|

esakal

पोटाचा त्रास

मात्र यामध्ये कोळंबीची चव अपेक्षेइतकी चांगली वाटत नाही. काही वेळा वाळू किंवा काही कण तोंडात जाणवू शकतात ज्यामुळे किरकोळ पोटाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे ही रेष काढून खाणे उत्तम असं तज्ञांचं म्हणणं आहे.

prowns

|

esakal

खाण्यासाठी योग्य

कोळंबीच्या पाठीवर हलकासा चीर दिल्याने ही रेष काढता येते. त्यानंतर कोळंबी धुवून खाण्यासाठी योग्य आहे

prowns (4).jpg

|

esakal

उत्तम

त्यामुळे अधिक स्वच्छतेसाठी कोळंबीची ही रेष काढूनच खाणं उत्तम मानलं जातं.

prowns (2).jpg

|

esakal

तोंडात ४००० तीक्ष्ण दात असूनही मगर शिकार अख्खीच्या अख्खी का गिळते? जाणून घ्या कारण...

crocodile

|

esakal

येथे क्लिक करा