Mansi Khambe
आज म्हणजेच रविवार ७ सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे पूर्ण ग्रहण असेल आणि देशात कुठेही पाहता येईल. २०२२ नंतर भारतात दिसणारे हे सर्वात मोठे आणि पूर्ण चंद्रग्रहण असेल.
Chandra Grahan 2025
ESakal
चंद्रग्रहणामुळे चंद्राचा रंग लाल किंवा नारिंगी दिसू लागतो. याला ब्लड मून म्हणतात. पण ब्लड मून म्हणजे नक्की काय आणि चंद्र एका वर्षात किती रंग बदलतो याबद्दल जाणून घ्या.
Chandra Grahan 2025
ESakal
ब्लड मून म्हणजे रेड मून. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा सूर्याचा थेट प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. या परिस्थितीत, चंद्र पूर्णपणे गडद होण्याऐवजी तो गडद लाल किंवा तांब्यासारखा रंगात बदलतो.
Chandra Grahan 2025
ESakal
चंद्राचा मूळ रंग राखाडी असून चंद्राचा रंग कधीच बदलत नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जातो आणि माणसांच्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो त्यामुळे चंद्र वेगवेगळ्या रंगात दिसतो.
Chandra Grahan 2025
ESakal
तसेच वातावरणात असलेले धूळ, ओलावा आणि वायू प्रकाश पसरवतात आणि म्हणूनच चंद्र कधी पांढरा, कधी पिवळा, नारिंगी किंवा लाल दिसतो.
Chandra Grahan 2025
ESakal
जेव्हा चंद्र आकाशात उंच असतो तेव्हा तो आपल्याला अधिक पांढरा आणि तेजस्वी दिसतो. परंतु क्षितिजाच्या जवळ येताच त्याचा प्रकाश जाड वातावरणीय थरातून जावा लागतो. या काळात निळा प्रकाश अधिक पसरतो आणि चंद्र पिवळा किंवा नारिंगी दिसतो.
Chandra Grahan 2025
ESakal
या वर्षीचे हे दुसरे पूर्ण चंद्रग्रहण आहे, पहिले चंद्रग्रहण मार्चमध्ये झाले होते. २०२२ नंतरचे हे सर्वात मोठे पूर्ण चंद्रग्रहण असल्याचे मानले जाते. खगोलशास्त्र प्रेमींसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे.
Chandra Grahan 2025
ESakal
हे चंद्रग्रहण सामान्य प्रेक्षकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. ते उघड्या डोळ्यांनी पाहता येते. तसेच दुर्बिणी वापरू शकता, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचे प्रत्येक तपशील पाहणे सोपे होईल.
Chandra Grahan 2025
ESakal
भारतीय प्रमाण वेळेनुसार, हे चंद्रग्रहण रात्री ९:५८ वाजता सुरू होईल. त्यानंतर, हे ग्रहण रात्री ११:४२ वाजता त्याच्या शिखरावर पोहोचेल, जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असेल आणि एका सुंदर लालसर रंगाने दिसेल.
Chandra Grahan 2025
ESakal
Judge
ESakal