सकाळ वृत्तसेवा
पावसाळ्यात बऱ्याचदा ढगफुटीच्या घटना घडल्याचे समोर येते महाराष्ट्रात तसेच देशात अनेक ठिकणी ढगफुटीसारखा पाऊस पडल्याचे आपण ऐकतो.
आज आपण ढगफुटी नेमकी का आणि कशी होते याबद्दल जाणून घेणार आहोत.
हवामानशास्त्राच्या मते जर कोणत्याही ठिकणी एका तासात १० सेंटीमीटरहून अधिक पाऊस झाला तर त्याला ढगफुटी असे म्हटले जाते.
वैज्ञानिक भाषेत याला क्लाउडबर्स्ट किंवा फ्लॅश फ्लड देखील म्हणतात, अचानक तुफान पाऊस होण्यास ढगफुटी म्हणतात.
ढगफुटीच्या घटनेत अगदी कमी वेळात खूप जास्त प्रमाणात पाऊस होतो.
ढगफुटीच्या वेळी मोठ्या प्रणाणात ढग एका जागी गोळा होतात, त्यामुळे पाणी एकत्र जमते.
एकत्र जमलेल्या पाण्याचे वजन इतके वाढते की ढगाची घणता प्रचंड वाढते आणि अचानक जोरात पाऊस सुरू होतो.
सामान्यत: जमिनीच्या पृष्ठभागापासून १२ ते १५ किलोमिटरच्या उचींवर ढगफुटीची घटना होते. डोंगरामुळे ढग पुढे सरकू शकत नाहीत.
त्यामुळे एकाच जागी जोरात पाऊस होतो, अगदी काही सेकंदात २ मिमीहून अधिक पाऊस होतो.
तेजस्विनीचे 'हे' चित्रपट माहिती आहेत का?