Aarti Badade
धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीमुळे ‘ढवारा मटण’ हा शब्द सध्या सगळीकडे चर्चेत आहे. काय आहे हे खास मटण?
‘ढवारा’ हा मराठवाड्यातील पारंपरिक शब्द. स्थानिक देवी-देवतांच्या पूजेनंतर जो कंदुरीचा कार्यक्रम होतो, त्याला ‘ढवारा’ म्हणतात.
देवतेला नैवेद्य दाखवून अख्ख्या बोकडाचे मटण गावात वाटले जाते. या परंपरेतूनच ढवारा मटण तयार होते.
हे मटण खास. मटण आधी उकळत नाही, थेट कापलेल्या बोकडाच्या मांसाची थेट डिश बनवली जाते.
धाराशिवचं हॉटेल भाग्यश्री याच पारंपरिक पद्धतीने 'ढवारा मटण' सर्व्ह करतं – आणि ते फक्त चव नाही, अनुभव देखील आहे!
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा डायलॉग – “नाद करती का?” – इंटरनेटवर व्हायरल झालाय!
मराठवाड्याच्या मातीतून आलेला ‘ढवारा’ शब्द आणि त्यामागची परंपरा आता महाराष्ट्रभर पोहचली आहे.
केवळ मटणासाठी नाही, तर या अनोख्या अनुभवासाठी महाराष्ट्रभरातून लोक हॉटेल भाग्यश्रीला भेट देत आहेत.
एक छोटं हॉटेल आणि स्थानिक परंपरा – याचं ब्रँडिंग इतकं जबरदस्त झालं की आज ती ट्रेंड बनली आहे!