Mansi Khambe
आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाच्या भारतीय नागरिकांचा पुरावा मानला जातो. बँक खातं उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत याचा मोठा वापर होतो.
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal
आधार कार्डचा रंग पांढरा असल्याचे माहित असेलच. पण तुम्हाला माहिती आहे का, लहान मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते? याबाबत सविस्तर जाणून घ्या.
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal
'युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया' (UIDAI) पाच वर्षांखालील मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड, ज्याला 'बाल आधार' (Baal Aadhaar) म्हणतात.
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal
रंगावरून ते सहज ओळखता येते, परंतु बाल आधार आणि सामान्य आधार कार्ड यांच्यात इतरही काही महत्त्वाचे फरक आहेत, ज्याबद्दल पालकांना माहिती असणे आवश्यक आहे.
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal
पांढरे आधार कार्ड आणि निळ्या रंगाचे 'बाल आधार' यांच्यातील मुख्य फरक म्हणजे बायोमेट्रिक डेटा.
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal
पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना दिले जाणाऱ्या पांढऱ्या आधार कार्डमध्ये हाताच्या सर्व १० बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांची (iris) माहिती असते.
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal
पाच वर्षांखालील मुलांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही, कारण त्यांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बाहुलीचे नमुने अजूनही विकसित होत असतात.
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal
बाल आधार हे मुलाचा फोटो, लोकसांख्यिकीय माहिती आणि पालकांपैकी एकाच्या आधार कार्डशी जोडून (लिंक करून) जारी केले जाते.
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal
निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड पालकांच्या आधार कार्डशी जोडलेले असते, त्यामुळे ते स्वतंत्र ओळखपत्र म्हणून काम करत नाही. मात्र सामान्य पांढरे आधार कार्ड हे एक स्वतंत्र ओळख दस्तऐवज असते.
Blue And white Aadhaar Card Difference
ESakal
High cholesterol causes
Sakal