सकाळ डिजिटल टीम
सलग दोन भूकंपाच्या धक्क्यांनी व्हेनेझुएला हादरलं असून शहरात विध्वंस झाला आहे. अनेक इमारती कोसळून १० हजार मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतेय.
Earthquake
Esakal
व्हेनेझुएलात आलेल्या भूकंपाला डबलेट भूकंप म्हटलं जात आहे. ही दुर्मीळ घटना असून खूप कमी ठिकाणी असं घडतं.
Earthquake
Esakal
एकाच जागी सतत दोनदा भूकंप येतो तेव्हा त्याला दुहेरी किंवा डबलेट भूकंप म्हटलं जातं. यामध्ये दोन भूकंपाच्या धक्क्यात खूपच कमी अंतर असतं पण त्याची तीव्रता सारखी असते.
Earthquake
Esakal
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेने सांगितलं की, ७ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे २ भूकंप एका मिनिटापेक्षा कमी वेळेत झाले.
Earthquake
Esakal
भूगर्भाचा वरचा भाग हा टेक्टॉनिक प्लेटपासून तयार झालाय. हा दगडांचा थर असून हळू हळू सरकत असतो. याच दोन प्लेट एकमेांवर धडकल्यानंतर भूकंपाचे धक्के जाणवतात.
Earthquake
Esakal
सामान्य भूकंपात मोठा धक्का बसतो आणि एकाच वेळी उर्जा बाहेर पडते. यात होणारं नुकसान आणि धोका कमी असतो.
Earthquake
Esakal
डबलेट भूकंपात दोन मोठे धक्के बसतात. यामुळे भूगर्भातून दोन वेळा उर्जा बाहेर पडते. यात नुकसान जास्त आणि धोकाही असतो.
Earthquake
Esakal
व्हेनेझुएलाच्या आधी २०२३मध्ये तुर्कित डब्लेट भूकंप झाला होता. ७.८ आणि ७.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे हादरे बसले होते.
Earthquake
Esakal
kanchani mahal
Esakal