'एल निनो' आहे तरी काय? 'ला निना' म्हणजे काय?

सूरज यादव

एल निनोचं संकट

यंदा एल निनोचं संकट असून यामुळे भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.

El Nino and la nina

|

Esakal

मान्सून

सामान्यपणे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील थंड पाणी पश्चिमेकडे सरकत असते. त्यामुळे आशियाई देशांमध्ये विशेषतः भारतात मॉन्सून सक्रिय राहतो.

El Nino and la nina

|

Esakal

व्यापारी वारे

प्रशांत महासागरातील विषुववृत्ताजवळील समुद्राच्या पाण्याचे तापमान साधारणपेक्षा 0.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढू लागते, त्यावेळी व्यापारी वारे कमकुवत होतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे मंदावल्याने उष्ण पाणी एका भागात साचते.

El Nino and la nina

|

Esakal

मान्सूनचे ढग कमकुवत

एल निनोच्या काळात समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढते आणि वाऱ्याची दिशा बदलते. मॉन्सूनचे ढग कमकुवत होतात. यामुळे पाऊस कमी पडतो, तसंच उशिरा सुरू होतो.

El Nino and la nina

|

Esakal

वर्षभर प्रक्रिया

एल निनोची ही प्रक्रिया काही महिन्यांपासून ते वर्षभर टिकू शकते. हवामान विभागाने यावर्षी उत्तरार्धात पावसात खंड पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

El Nino and la nina

|

Esakal

'ला निनो' म्हणजे काय ?

'ला निनो' ही एल निनोच्या उलट स्थिती मानली जाते. या अवस्थेत प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा कमी होते. त्यामुळे भारतात सामान्यतः चांगला पाऊस पडण्यास मदत होते.

El Nino and la nina

|

Esakal

खरीपासाठी पोषक

ला निनोमुळे अनेकदा अतिवृष्टी, पूरस्थिती किंवा दीर्घकाळ पाऊस सुरू राहणे, असे परिणामही दिसतात. साधारणपणे ला निनोचे वर्ष खरीप हंगामाकरिता पोषक मानले जाते.

El Nino and la nina

|

Esakal

लहान मुलगा

एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. या शब्दाचा अर्थ लहान मुलगा असा होतो.

El Nino and la nina

|

Esakal

गोपाळगड किल्ला आहे कुठे, इतिहास काय? विकत घेतल्याच्या वादामुळे आलाय चर्चेत

Gopalgad Fort

|

Esakal

इथं क्लिक करा