Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गनिमी कावा युद्ध पद्धत वापरली जात होती.
ही युद्ध पद्धत वापरुन महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या.
पण अनेकांना माहिती नसते की गनिमी कावा म्हणजे नेमका काय प्रकार आहे.
इतिहासातील सर्वात प्रसिद्ध युद्ध पद्धत म्हणजे नेमके काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
आपल्याकडे पैसा कमी, हत्यारेही कमी व शत्रूच्या मानाने सैन्यबळ कमी, डोंगराळ प्रदेश अशी वस्तुस्थिती असल्यासमुळे शत्रूशी लढण्यासाठी महाराजांनी एका खास लढाईच्या पद्धतीचा आश्रय घेतला.
एक नवीन युद्ध तंत्र अंमलात आणले. त्यास आपण गनिमी काव्याचे युद्ध असे म्हणतो. यात जास्तीत जास्त बचाव करून शत्रूचे जास्त नुकसान करायचे असते.
कमी संख्येच्या सैन्याने जास्त सैन्याला हरवता येतं. बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी केली जाते.
अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्यावर परिणाम होतो.
हल्ली गनिमी कारवायांमध्ये गुप्तचर कारवाया तसेच भारतीय सेनेत वापर केला जातो. महाराजांच्या या युद्ध पद्धतीचा आजही वापर होतो.