HD मेकअप म्हणजे काय?

Monika Shinde

मेकअप

तुमचं लुक कॅमेऱ्यात परफेक्ट दिसावं हाच उद्देश असतो. जाणून घ्या HD मेकअपची खास वैशिष्ट्यं आणि फायदे आहे.

HD मेकअप म्हणजे काय?

HD म्हणजे "High Definition" जे कॅमेऱ्यात अगदी लहानसुद्धा दोष स्पष्ट दाखवतं. म्हणून HD मेकअप विशेषतः फोटोशूट आणि शूटिंगसाठी केला जातो.

एचडी मेकअपचं वैशिष्ट्य

या मेकअपमध्ये चेहऱ्यावरील डाग, पुरळ, रेषा लपवले जातात. त्याचबरोबर तो नैसर्गिक दिसतो, जड वाटत नाही आणि ग्लो देतो.

एचडी मेकअप किती प्रकारचे असतात

Airbrush HD मेकअप, Mineral HD मेकअप आणि Liquid HD मेकअप या ३ प्रकारचे एचडी मेकअप असतात

वधूंसाठी HD मेकअप

लग्नाच्या दिवशी वधू HD मेकअपचा अधिक वापर करतात. कॅमेऱ्यात फ्लॉलेस लुक देणारा हा मेकअप लग्नसराईत खूप ट्रेंडमध्ये आहे.

HD मेकअप कसा केला जातो?

प्रीमियम प्रॉडक्ट्स, स्पंज, ब्रश आणि योग्य ब्लेंडिंग याचा वापर करून HD मेकअप केला जातो. ब्लेंडिंग नीट केल्याने नैसर्गिक लुक मिळतो.

काय वापरलं जातं?

HD फाउंडेशन, हाय-कव्हरेज कन्सिलर, सेटिंग पावडर आणि सेटिंग स्प्रे यांचा वापर केला जातो. सगळं नीट मिसळल्याने मेकअपचा थर जाणवत नाही.

फायदे काय?

HD मेकअप अधिकवेळ टिकतो, चेहरा तेलकट होत नाही, डाग लपतात आणि नैसर्गिक ग्लो मिळतो.

ऑक्टोबरमधील संकष्टी चतुर्थी का आहे खास? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ

येथे क्लिक करा