सूरज यादव
हिबानामा म्हणजे एखाद्याने स्वेच्छेनं आपली मालमत्ता दुसऱ्याला भेट म्हणून दिल्याचा करार होय. हा करार कोणतीही आर्थिक देवाणघेवाण न करता, परतावा न घेता केला जातो.
‘हिबा’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ भेट देणे असा आहे. मुस्लीम कायद्यानुसार हिबा ही एक धार्मिक आणि कायदेशीर प्रक्रिया मानली जाते.
हिबानाम्यात घर, जमीन, दागिने, रोख रक्कम यांचा समावेश होतो. मालमत्ता हस्तांतर करताना ती देणाऱ्याच्या नावावर आणि मालकीहक्कात असावी लागते.
हिबा फक्त सुजाण आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीच करू शकतो. हिबा केवळ स्वतःच्या मालकीची व अस्तित्वात असलेली मालमत्ता असावी.
हिबा पूर्णतः स्वेच्छेनं झालेला असला पाहिजे. फसवणूक, दबाव किंवा जबरदस्तीने केलेला हिबा अमान्य ठरवला जातो.
हिबा जर लेखी स्वरूपात केला गेला तर त्याला ‘हिबानामा’ म्हणतात. हा कायदेशीर दस्तऐवज असून त्यात मालमत्तेचं स्पष्ट हस्तांतर नमूद असतं.
100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अचल मालमत्तेसाठी हिबानामाची नोंदणी आवश्यक असते. Indian Registration Act, 1908 नुसार स्टॅम्प ड्युटी देखील भरावी लागते.
हिबा एकदा पूर्ण झाला की तो सहज रद्द करता येत नाही. पण जर फसवणूक सिद्ध झाली तर न्यायालय हिबानामा रद्द करू शकते.